ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
चंद्रपूर:
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल हे आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत.
दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
उद्या सकाळी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री रंजितदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संवाद साधणे, महाविकास आघाडीमधील समन्वय वाढवणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांना आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण:
वेळ: उद्या सकाळी १०:३० वाजता.
ठिकाण: दि ग्रँड आयकॉन हॉटेल, जनता महाविद्यालयाजवळ, चंद्रपूर.





