Homeगडचिरोलीमौशीखांब चा मोरेश्वर उंदिरवाडे यांना मुंबई विद्यापिठाची पिएचडी प्राप्त.

मौशीखांब चा मोरेश्वर उंदिरवाडे यांना मुंबई विद्यापिठाची पिएचडी प्राप्त.

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर संपादक

गडचिरोली – गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील अत्यंत गरीब घराण्यातील वडीलाचे छत्र हरपलेला आजही म्हातारी आई मोलमजुरी करून मुलाला शिकविणारी अश्या बिकट परिस्थितीतुन शिक्षण घेऊन मुंबई विद्यापिठाची इंग्रजी विषयात पदवी प्राप्त करणारा मोरेश्वर उंदिरवाडे यांना मुंबई विद्यापिठाची नुकतीच पिएचडी प्राप्त केल्यामुळे त्यांचा मुंबई विधापिठातर्फ गौरव करण्यात आला असुन गडचिरोली जिल्ह्यात मोरेश्वर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मोरेश्वर काशिनाथ उंदिरवाडे यांचे वडीलाचे मोरेश्वर लहान असतांनाच निधन झाले. आई निंबुनाबाईआजही मोलमजुरी करून मोरेश्वरच्या शिक्षणासाठी सहकार्य करीत आहे. मोरेश्वरने आपले प्राथमिक शिक्षण वर्ग ७ पर्यत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मौशीखांब येथे घेतले व ७ वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला नंतर १० वी पर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल मौशीखांब येथे पुर्ण केले बोर्डाच्या परिक्षेत प्रथम क्रंमाक मिळविल्याबद्दल त्याचे वर्गशिक्षक मुनिश्वर बोरकर यांचेकडून त्यांना बक्षिस देण्यात आले होते. ग्रामपंचायत मौशीखांब कडून बक्षीस दिले तर समाज कल्याण विभाग गडचिरोली तर्फे मोरेश्वर यांना पाच हजार रुपये बक्षिस देऊन गौरविण्यात आले होते. हिच चिकाटी व शिक्षणाची ओढ निर्माण करून पूढील शिक्षण पुणे विद्यापिठातुन B.A इंग्रजी साहित्य पदवी प्राप्त करून मुंबई विद्यापिठातून m.A इंग्रजी साहित्य माध्यमातून प्राविण्य संपादन करीतच Net परिक्षापण उर्तीण झाला. आज मुंबई विद्यापिठातून phD प्राप्त करणारा मोरेश्वर यांचा पिएचडी संशोधनाचा विषय होता , शशी थरूर यांच्या निवडक साहित्यकृतीमधील राजकिय विचारसरणी साम्प्रदायिकता आणि धर्मनिरपेक्षता यांचा अभ्यास.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular