Homeकुरखेडागेवर्धा ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; स्वस्त RO पाणी, डेड बॉडी फ्रीज आणि गरोदर...

गेवर्धा ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; स्वस्त RO पाणी, डेड बॉडी फ्रीज आणि गरोदर मातांसाठी मोफत सोनोग्राफीची सुविधा.

संपादक मंगेश बन्सोड

नागरिकांच्या आरोग्य, पाणीपुरवठा आणि सामाजिक गरजांचा विचार करून ग्रामपंचायतीचे लोकहितकारी निर्णय.

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा ग्रामपंचायत नागरिकाभिमुख आणि लोककल्याणकारी उपक्रमांमुळे परिसरात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करत आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने RO Water ATM सुरू केले असून केवळ 5 रुपयांत 15 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

 

यासोबतच पाणी साठविण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाक्यांवरही ग्रामपंचायतीकडून विशेष अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत 75 टक्के खर्च ग्रामपंचायत आणि 25 टक्के खर्च नागरिक अशा स्वरूपात लाभ देण्यात येत असून या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी डेड बॉडी फ्रीजची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. गावातील नागरिकांना ही सुविधा 300 रुपयांत, तर बाहेरील नागरिकांना 700 रुपयांत दिली जात आहे. त्यामुळे दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना मोठा आधार मिळत आहे.

 

महिलांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामपंचायतीने आणखी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. गावातील गरोदर महिलांची पहिली आणि दुसरी सोनोग्राफी ग्रामपंचायतीच्या खर्चातून करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे माता व बाल आरोग्याबाबत जनजागृतीसह आर्थिक दिलासाही मिळत आहे.

 

पाणी, आरोग्य आणि सामाजिक सुविधांचा संगम घडवून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न गेवर्धा ग्रामपंचायत करत असून, हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे “आदर्श गाव – आदर्श ग्रामपंचायत” म्हणून गेवर्धाचे नाव परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular