गडचिरोली मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली – विज्ञानाच्या युगातही अंधश्रध्देचा प्रभाव किती खोलवर गेलाय यांचे ताजे उदाहरण कॉम्लेक्स गडचिरोली मधे राहणाऱ्या एका व्यवसायी ठेकेदारांने आपल्या इंजिनिअर पत्नीला जेवणात विभुती आणि चामोर्शी तालुक्यातील हरणघाट येथे राहणारा धार्मीकभोंदु महाराजाकडे राहण्याची शक्ती करून त्या इंजिनिअर तरुणीचा मृत्यु नागपूर येथे झाला व मृत्युचे कारण उघड झाले. भोंदु बाबा अशोक खरात केलेल्या प्रकरणासारखा प्रकार गडचिरोली जिल्हयात घडत असल्यामुळे हरणघाट येथील भोंदु महाराज व कंत्राटदार पती या दोघावरही गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती गडाचरोलीच्या वतीने करण्यात येत आहे.
कॉम्लेक्स गडचिरोली येथील पोलीस अधिक्षक कार्यालयातुन सेवानिवृत्त झालेले गंदेवार यांचा मुलगा व्यवसायाने कंत्राटदार असुन यांचा विवाह दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी नागपूर येथील व्यवसायाने इंजिनियर असलेली रिया गंदेवार हिच्या सोबत झाला होता. तिचा मृत्यु १४ एप्रिल २०२६ रोजी झाला पतिकडून रिया हिला नेहमी त्रास होत होता. दोन्ही कुटुंब सुशिक्षित असुन सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडल्याचा प्रकार घडला. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार रियाला लग्नानंतर नैर्यासाचा त्रास सुरु झाला होता त्यावर वैद्यकिय उपचार न करता तिला चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील कार्तिक स्वामी नाही तर हरणघाट येथील एका धार्मिक भोंदु महाराजाकडे ठेवण्यासाठी सासरच्या मंडळीकडून दबाव टाकण्यात येत होता असा आरोप तिच्या आईकडून होत असुन रियाच्या जेवणात गुपचुप विभूती टाकल्या जात असे व कुंडली न जुळल्यामुळे भविष्यात तिच्या अपत्यांवर परिणाम होईल असेही पसरविल्या जात होते. सततचा त्रासामुळे रिया आपल्या आईकडे नागपूरला राहायला गेली होती या दरम्यान दि. १४ एप्रिल २०२६ ला तिचा मृत्यु झाला. दरम्यान सोशल मिडियावर काही चित्रभितीमुळे प्रकरण चर्चेत आले होते. गंभीर आजारामधे तिला वैद्यकिय उपचार न करता सासरच्या मंडळीनी धार्मीक उपचाराकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात होता त्यामुळे परिस्थिती गंभीर होवून तिचा मृत्यु झाला या संपूर्ण घटनेमुळे सुशिक्षित कुटुंबअसुनही मानसिक उपचारा ऐवजी धार्मिक उपचार करणे म्हणजे अंधश्रध्दे कडे वळणे हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.





