मुख्य संपादक : मुनिश्वर बोरकर
सावली: सावली पोलीस स्टेशन अंतर्गत सामदा ( सोनापूर ) येथील बौद्ध समाजांनी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवात सामदा येथील विशाल ठाकर नामक युवकांनी रॉलीत येऊन धिंगांना घालुन महिलांची छेळखानी करून अश्लिल शब्दात जातीवाचक शिविगाळ केली याबाबत पोलीस स्टेशन सावली येथे रिपोर्ट दिली असता सहा. पोलीस मुसळे यांनी थातूरमातूर कलमान्वये गुन्हा नोंद करून दारू विक्रेत्या गुन्हेगारास अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्तंगत व विनयभंगाचा गुन्हा नोंद न करता कारवाई केली नाही. उलट आरोपीला सरंक्षण देण्याचा प्रयत्न केला त्याकडे सामदा बौद्ध समाज बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करून ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक चंद्रपर आज दि. २२ एप्रिल २०२६ रोजी समाजाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली. तसेच दारू विक्रेत्या गुन्हेगारास सरंक्षण देणाऱ्या सहा. पोलीस निरिक्षक मुसळे यांना निलबिंत करावे अशीही मागणी सामदा बौध्द बांधवानी केली.





