Homeआंधळी"मोफत बस, गणवेश, बॅग व MS-CIT संगणक प्रशिक्षण; आंवण हायस्कूलची विद्यार्थ्यांसाठी आकर्षक...

“मोफत बस, गणवेश, बॅग व MS-CIT संगणक प्रशिक्षण; आंवण हायस्कूलची विद्यार्थ्यांसाठी आकर्षक शैक्षणिक योजना”.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

कुरखेडा तालुक्यातील आंधळी फाटा येथील आंवण हायस्कूलकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधांची आकर्षक घोषणा

कुरखेडा तालुक्यातील आंधळी फाटा येथे स्थित आंवण हायस्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मोफत सुविधा उपलब्ध करून देत आहे. सन १९९७ पासून शैक्षणिक सेवा देणारी ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक शैक्षणिक साहित्य व सुविधा देण्यावर भर देत आहे.

 

शाळेत प्रवेश घेणाऱ्या इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बस सेवा, स्कूल बॅग, शालेय गणवेश, स्पोर्ट्स युनिफॉर्म, स्पोर्ट्स शूज तसेच ( MS-CIT ) संगणक प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. १५ जून पासून (MS-CIT ) संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.

 

विशेष म्हणजे आजू बाजूच्या गावामध्ये देखील बस सेवा उपलब्ध असून आता कसारी (तुकूम) ते आंधळी फाटा या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

 

संस्थेचे उद्दिष्ट केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, क्रीडा व तांत्रिक ज्ञानाचा विकास घडविणे हे आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular