Homeदेसाईगंजमहावितरण कंपनीचा गोरगरीब जनतेवर आर्थिक अत्याचार? अचानक दुप्पट वीजबिलामुळे नागरिक संतप्त.

महावितरण कंपनीचा गोरगरीब जनतेवर आर्थिक अत्याचार? अचानक दुप्पट वीजबिलामुळे नागरिक संतप्त.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

देसाईगंज:

महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ज्या ग्राहकांना यापूर्वी दरमहा ७०० ते ८०० रुपये वीजबिल येत होते, त्यांना आता अचानक १५०० ते १६०० रुपयांपर्यंत वीजबिल आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

वरून गावखेड्यामध्ये महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असते. ३ ३ ४ ४ तास वीज पुरवठा खंडित होत असते. त्यावर महावितरण कंपनी लक्ष देत नाही.

महागाईच्या काळात आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांवर वाढीव वीजबिलाचा अतिरिक्त भार पडत आहे. अनेक नागरिकांनी महावितरणकडे तक्रारी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

 

नागरिकांच्या मते, वीज वापरात कोणतीही मोठी वाढ नसताना बिलात जवळपास दुप्पट वाढ कशी झाली, याचे स्पष्टीकरण महावितरणने द्यावे. तसेच वाढीव बिलांची तात्काळ चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

 

यासंदर्भात सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली असून, महावितरण प्रशासनाने जनतेच्या समस्या गांभीर्याने घेऊन पारदर्शक पद्धतीने वीजबिलांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular