ज्वाला न्यूज
मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक ज्वाला न्युज गडचिरोली
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासक विभागाचे मुख्यअधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धसक्यामुळे भेसळयुक्त पदार्थ पकडण्याची प्रक्रियाचे लोन गडचिरोली शहरात सुद्धा पोहचले त्यामुळे खर्रा खुटका विक्रेत्यांनी आपापली पानटपरी बंद ठेवून घरातच खर्रे बनवुन विक्री तसेच खिश्यात खर्रे भरून जुन्या गिर्हाईकांना राजरोजपणे विक्री सुरु आहे. खर्रा शौकीन म्हणतात खर्राला देशी निपचा भाव आला आता दारू व खर्रा सुद्धा चोरट्या मार्गानेच.
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी आहे तरीही दारूला काही कमी नाही दारुविक्रेते बार सारखे धंदे चालवितात व रात्रौ दारूची तस्करी होते. आता खर्रापण दारू सारखा चोरटा व्यापार सुरु झालेला आहे. गडचिरोली ठाण्याचे ठाणेदार व पोलीस यांना दारू दुकाने व सुंगधित तंबाखाचा साठा माहीत असुन सुद्धा जाणुन बुजुन दुर्लक्ष केल्या जात आहे याचे कारण जनतेला माहीत आहे.
याचे कारण असे की दि. २० जुन २०२६ ला उपविभागीय पोलीस अधिकारी तथा आयपिएस अधिकारी अनिकेत हिरडे यांनी गोकुळनगर येथील विवेक अवधराम गुप्ता यांच्या घरातून २ लाख १५ हजारांचा सुंगधित तंबाखूचा साठा पकडला व चार जनाविरुध्द गुन्हा दाखल केला.
जप्त केलेल्या साहित्यात हुक्का ८२ पॉकेट सुपारी 323 किलो ईगल ६७ डब्बे खर्रा .पन्नी व इतर साहित्य मिळून २ लाख १५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जितेंद्र कुंजाम यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमधे आरोपी विवेक गुप्ता 3१ , यश सुभाष चव्हाण ३१ अजय शतीश गेडाम 30 अनिकेत घनश्याम बांबोळे २७ सर्व गोकुळ नगर यांना अटक करण्यात आली.
यावर एक प्रश्न उपस्थित होतो तो उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एवढा मोठा साठा गुप्त माहीतीच्या आधारे माहीत होतो परंतु गडचिरोली पोलीसांना माहीतच होत नाही कि झोपेच सोंग घेत आहेत. अश्या अवैध धंद्यांना आळा घालायचे असेल तर खर्रा , दारू विक्रेते व याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी व्यवसायाला पाठीसी घालणार्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.





