Homeकुरखेडाजांभुळखेडा जंगलात मोहफुलाची दारू काढत असतांनाच कुरखेडा पोलिसांनी पकडली.

जांभुळखेडा जंगलात मोहफुलाची दारू काढत असतांनाच कुरखेडा पोलिसांनी पकडली.

ज्वाला न्यूज

गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज गडचिरोली

कुरखेडा:  गुप्त माहीतीच्या आधारे कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघ व त्यांचे सहकारी संतोष कांबळे , पोशी भैसारे व इतरांनी दि. २१ जुन च्या रात्रौ कुरखेडा तालुक्यातील २ कि.मी अंतरावरील जांभुळखेडा जंगलात पोहचले तर तिथे काही व्यक्ती मोहफुलाची दारु हातभट्टी वरून काढत असतांनाच रंगेहात पकडले.

जांभुळखेडा हद्दितिल जंगल परिसरातील नरेश बोधीलाल राऊत वय ५० वर्ष राहणार मोहगांव यांच्या शेतात त्यांचा सहीत अशोक सिताराम मडावी ४४ वर्ष रा. वाकडी ,दिपक देवराव बन्सोड 3८ जांभुळखेडा सर्व कुरखेडा तालुका यांना कुरखेडा पोलीसांनी रंगेहाथ पकडले.

यात ८१० किलो मोहफुलाचा सडवा ७५ लिटर हातभट्टीची दारू एकून ९६ हजाराचा माल सहीत तिघांना ताब्यांत घेतलें व गुन्हा दाखल केला गुन्हांचा अधिक तपास पोहवा व संतोष कांबळे हे करीत आहेत तर याच दिवशी कुरखेडा येथील कार्तिक बळीराम लाळे हा दारू विक्री करीत असतांना त्यांना पकडून त्यांचेवर गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वाघ , पोहवा ,भैसारे व कांबळे आदिंनी केला तर रात्रौच्या वेळस जांभुळखेडा जंगलात जावुन मोहफुलाची दारू पकडण्याची हिमंत दाखविल्यामुळे कुरखेडा पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular