ज्वाला न्यूज
डोंगरगाव (चिखली): अत्यंत दुर्दैवी घटनेत डोंगरगाव (चिखली) येथील ट्रॅक्टर चालक योगेश पेंदोर (वय 35 वर्षे) यांचा अपघाती मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पेंदोर हे ट्रॅक्टरने शेतात चिखलाचे काम करण्यासाठी जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर शेतात पलटी झाला आणि तो त्यांच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.





