ज्वाला न्यूज
गडचिरोली:
कुरखेडा : सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली यांनी चेतन नेवशा काटंगे यांची कुरखेडा तालुका अध्यक्ष (महाराष्ट्र प्रदेश) पदावर नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण मोंगरिया यांच्या सहमतीने तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र विश्वनाथ उंदीरवाडे यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आले.
चेतन काटंगे यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक न्याय, अनुसूचित जाती-जमातींचे प्रश्न, जनजागृती आणि समाजहिताच्या उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी संघटनेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





