मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली – देसाईगंज तालुक्यातील सांवगी ग्रामपंचायत च्या सरपंचा प्रभा मनोज ढोरे हिने शासकिय जागेवर बिना परवाना पक्के घर बांधुन वहिवाट करीत असल्याची तक्रार देवचंद पांडुरंग मेश्राम यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे केली असता चौकशीअंती शिद् झाल्याने सांवगीच्या सरपंचा प्रभा ढोरे यांना पायउतार व्हावे लागले.
वनविभागाच्या सर्व्हे नंबर 33४ जागेवर प्रभा ढोरे हिच्या सासऱ्याने पक्के घर बाधले होते त्यानंतरही सरपंच प्रभा ढोरे हिने त्याच सर्व्हे नंबरवर तहसिलदार किंवा ग्रामपंचायतची परवानगी न घेता नविन पक्के घर बांधुन आपला संसार थाटला होता. तक्रारीनुसार आदेशात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा अधिनियम क्र. 3 चे कलम १४ (१) (ज – 3 ) चा भंग केल्याने शिध्द झाल्याने तिचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पद अनर्ह ठरविण्यात आले.





