मुनिश्वर बोरकर संपादक गडचिरोली
वडसा :
प्रेरणाभूमी महाविहार सावंगी (वडसा) येथे दि. १० मे २० 26 ला सकाळी १० वाजता द्वितिय वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक प्रेरणा भूमी महाविहाराचे अध्यक्ष काशिनाथ मेश्राम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत्न शिवनी बोधानंद महाथेरो नागपूर हे राहणार आहेत तर विशेषअतिथी म्हणुन आमदार रामदास मसराम ठाणेदार अजय जगताप वडसा सरपंच प्रभाताई ढोरे सावंगी सुमंतभाऊ मेश्राम उपसरपंच सांवगी तर सत्कारमूर्ती धम्मज्योती दिवाकर डोंगरे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्राचार्य डॉ. देवेश कांबळे ब्रम्हपुरी डॉ. युवराज मेश्राम ब्रम्हपुरी प्रा. डॉ. स्निग्धा काबळे प्राचार्य राजेश डांगे प्रशांत मेश्राम गोंदिया तर विशेष अतिथी म्हणुन दिपक साखरे इंजि. विजय मेश्राम डॉ. चंद्रशेखर बांबोळे विजय बन्सोड बुध्दिष्ट सोसायटी इंजि. सुनिल आमटे डॉ. अक्षय तागडे आदि लाभणार आहेत.
तरी बौद्ध उपासक उपापिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुज्य भन्ते महामोगलायन सांवगी वडसा यांनी केलेले आहे.





