मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वा वर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्व प्रथम सकाळी १०.वाजता समिती च्या अध्यक्ष ममता जांभूळकर , सचिव श्यामला राऊत व कोषाध्यक्ष कविता मेश्राम यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.दुपारी ११.वाजता पुज्य भंते धम्मसेवक महाथेरो यांना सामूहिक भोजन दान करण्यात आले.दुपारी १.वाजता वित्त व नियोजन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री ॲड आषिश जयस्वाल यांनी दीक्षाभूमी देसाईगंज ला सदिच्छा भेट दिली तसेच भगवान बुद्ध व बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले.विहारात त्यांना महीला समिती कडून शाॅल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.आपल्या छोटेखानी मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी दीक्षाभूमी देसाईगंज परीसराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.त्यांच्या सोबत आरमोरी क्षेत्राचे माजी आमदार मा.कृष्णाभाऊ गजबे, शिवसेनेचे सुरेंद्र चंदेल ,आरमोरी क्षेत्राचे विद्यमान आमदार रामदास मसराम साहेब देसाईगंज न.प.चे उपाध्यक्ष मा.नरेश विठ्ठलानी उपस्थित होते. २.वाजता परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले होते त्यापूर्वी पन्नास गरजू महिलांना मा.प्रसेनजीत प्रधान साहेब , उपविभागीय अधिकारी महसूल विभाग, देसाईगंज यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोषण आहार किटचे वाटप केले.परित्राण पश्चात फळ वाटप व खिरदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समिती चे सल्लागार मारोती जांभूळकर,चंदूराव राऊत,इंजि.विजय मेश्राम,विद्यानंद मेश्राम,राजरत्न मेश्राम, प्रकाश बारसागडे, पुरुषोत्तम बडोले, डॉ संजय मेश्राम,गुलशन डांगे,धीरज तडसे,दुधराम शेंडे, अरविंद लांजेवार समितीच्या उपाध्यक्षा रत्नमाला बडोले व यशोदा मेश्राम, सरीता बारसागडे, प्रतिभा बडोले, जयश्री लांजेवार, सुनीता नंदागवळी, प्रतिमा शेंडे,लीना पाटील,जीजा सहारे यांनी सहकार्य केले





