भंडारा: जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक अशी घटना घडली .नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी गेलेल्या एका ३० वर्षे महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. सदरची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात घडली असेल माधुरी तुळशीदास अंबादे वय ३० वर्ष राहणार ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गौरव अंबादे राहणार ब्रह्मपुरी असे संशयित आरोपीचे नाव आहे .
ब्रह्मपुरी येथील माधुरी अंबादे त्यांची मुलगी जानवी व गौरव अंबादे हे तिघेही काल रविवारी २६ एप्रिल रोजी लाखनी तालुक्याच्या पालांदूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते तेथील विवाह आटपून गावाकडे येण्यासाठी निघाले असता उशीर झाल्याने रात्री लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील नातेवाईक नाजूका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला .
रात्री सर्वांनी जेवण केले आणि झोपी गेले अशातच आज सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास माधुरी यांची मुलगी जाणवी हिच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला आवाजामुळे घरमालक नाजूका गणवीर यांना जाग आली त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता संशयीत आरोपी गौरव अंबादे हा घाईघाईने त्याच्या दुचाकीवरून पडून जात असल्याचे त्यांना दिसले संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता माधुरी या रक्ताच्या थोरड्यात पडलेल्या होत्या आरोपीने माधुरी यांचे उशिने तोंड दाबून पायास स्कॉर्पने बांधले व धारदार शस्त्राने गळा चिरला आणि शरीरावर इतर ठिकाणीही गंभीर जखमा आढळून आल्याने परिसरात एकच खडबळ माजली.
गावात माहिती होता ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली त्यानंतर घटनेची माहिती लोकांनी लाखांदूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान संशयित आरोपी गौरव अंबादे याच्यावर लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी फरार झाल्याने पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत.





