वडसा – देसाईगंज – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिल त्यामुळे आम्हाला स्वातंत्र समता बंधुतत्वा प्राप्त झाले आज काही धर्माध्द जातीयवादी शक्ती संविधान बदलविण्याची भाषा करतात त्यासाठी बहुजनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे म्हणुन इतिहास जाणुन घेण्यासाठी फक्त बाबासाहेबच वाचा अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी देसाईगंज दिक्षाभूमी येथील पदस्पर्श दिनाच्या सोहळ्या प्रसंगी केले.
सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दिनाचा सोहळा दिक्षाभूमी वडसा येथे दि. २९ एप्रिलला पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. नामदेवराव किरसान हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार रामदास मसराम अभारिप चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळू उर्फ प्रविण खोब्रागडे शिवसेनचे सुरेंद्रसिंह चंदेल खोरीपाचे देशक खोब्रागडे चंद्रपूर अभारिप चे रोहिदास राऊत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर सामाजिक कार्यकर्ते मारोती जांभुळकर माजी सभापती चंद्रशेखर भडांगे इंजि. विजय मेश्राम सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बुल्ले जिवन बागडे वंचितचे राजरतन मेश्राम दुधाराम शेन्डे प्रकाश बारसागडे अरविंद लांजेवार नागेश रामटेके मोरध्वज शिंपोलकर पुरुषोत्तम दुधेआदि लाभले होते.
सत्कारमुर्ती बाळू उर्फ प्रविण खोब्रागडे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे ब्रम्हपुरी सामाजिक कार्यकर्त चंदुराव राऊत वडसा यांचा खासदार डॉ.. नामदेव किरसान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मंडळाचे अध्यक्षा ममता जांभुळकर ह्या होत्या.
याप्रंसगी आमदार रामदास मसराम यांनी दिक्षाभूमी वडसाच्या विकासासाठी माझे सदैव प्रयत्न राहणार आहे. मी जरी दिक्षाभूमी कार्यक्रमात नेहमीच येत असलो तरी मंडळांनी मला जास्त बोलण्याची संधी घ्यावी कारण मी आमदार आहे असेही म्हणाले. सत्कारमूर्ती चंदु राऊत यानी दिक्षाभुमीच्या विकासासाठी एक महिन्याचे पेंन्शन धम्मदान केले
कार्यक्रमानंतर अंजली गडपाले आणि त्यांचा संच हैद्राबाद प्रस्तुती यांचा संगितमय गिताच्या कार्यक्रमाने रंगत आणली. कार्यक्रमाचे संचलन प्रविण मुंजमकर प्रास्ताविक सरिता बारसागडे यांनी केले कार्यक्रमास मंडळाच्या सचिव शामला राऊत कोषाध्यक्ष कविता मेश्राम उपाध्यक्ष रत्नमाला बडोले यशोदा मेश्राम |सहसचिव विद्याताई लोखंडे सदस्य गायत्री वाहणे लिना पाटिल प्रतिभा बडोले आदिंनी अथक परिश्रम घेतले. कार्यकमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.





