ज्वाला न्यूज
देसाईगंज :
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पुलाच्या (नाल्यावरील) बांधकामाचे काम अद्यापही अपूर्ण असून त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि संबंधित प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जर हे काम ग्रामपंचायत विभागातील नसेल तरी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची बाजू घेऊन न्याय द्यावा.
या नाल्याच्या चारही बाजूंना शेती असून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, पुलाचे काम विस्कळीत अवस्थेत असल्याने या मार्गाने ये-जा करणे अशक्य झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना तब्बल १० ते १२ किलोमीटरचा जंगलातील वळसा घालून शेतीवर जावे लागत असून वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदार यांच्याकडे तात्काळ पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी पर्यायी सुरक्षित मार्गाची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मुख्य मुद्दे :
२ वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण.
ग्रामपंचायत व प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप.
शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास मोठा अडथळा.
१०–१२ किमी जंगलातून वळसा घालण्याची वेळ.
पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी.





