ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
देसाईगंज (कसारी तुकूम) :
पिंपळगाव ते कसारी मार्गावर वन्यप्राण्यांच्या हालचाली आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी विशेषतः सकाळी व रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी. एकट्याने जंगल परिसरात जाणे टाळावे तसेच वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि काही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाचा इशारा : नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित अंतर ठेवावे आणि वन्यप्राण्यांना चिथावणी देऊ नये.





