Homeगडचिरोलीसुरजागड आजुबाजुचा गावातील लाल रंगाची जागा दुसरा लाल रंग घेत आहे.

सुरजागड आजुबाजुचा गावातील लाल रंगाची जागा दुसरा लाल रंग घेत आहे.

गडचिरोली – संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली ,

एटापल्ली – गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली लॉयड्स स्टील ची खाण आहे. सुरजागडच्या डोंगरात खाणीतून उपसलेली माती डोंगरा खालील गावातून नदी नाल्यात, शेतात पसरते. मलमपाडी गावातील लोकांची दैनिय अवस्था आहे असे सामाजिक कार्यकती श्रृंगारपवार यांनी प्रत्यक्षदर्शी पाहणी केली

आता उन्हाळा आहे. गाईगुरे ओढ्यात पाणी प्यायला जातात. चिखलात रुततात. ह्या गावात आता पर्यंत ६ गुरे अशी मेलीत. ओढ्यातील मासे बेडुक वगैरे मेले, शेतातून धानाचे पीक अर्ध्यावर आले .

” विकासाचा ” फटका ज्याना बसतो त्यांना पुरेशी नुकसान भरपाई तरी आवश्यक आहे. ह्या गावातील बहुसंख्य आदिवासीं दोन तीन पिढ्या पूर्वी छत्तीसगड मधून महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेले ओराऊ आदिवासी आहेत. राज्याच्या यादीनुसार अनुसूचित जमात नाहीत. जमीन मालकीचा कोणताही पुरावा नाही. नुकसान भरपाई चा प्रश्न येत नाही.

दोन वर्षापूर्वी ४० वर्षीय अशोक टोपो जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या जन सुनावणीला गेला. आपल्या शेताचे झालेले नुकसान सांगितले. पण नुकसान भरपाई चा प्रश्न येत नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी भाषेत आणि सत्तेच्या आवाजात सांगितले. कारण ओराऊ आदिवासी महाराष्ट्रात आदिवासी नाहीत, शिवाय अशोक कडे कागदपत्रे सुद्धा नव्हती.अशोक घरी आला, रात्री जेवला आणि कधीतरी पहाटे गळ फास लावून आपली जिवन यात्रा संपविली.

ह्या गावातून नक्षलवाद संपविला आहे परंतु दुःख संपले नाही. एका लाल रंगाची जागा दुसरा लाल रंग घेतो आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular