HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दीक्षाभूमी देसाईगंज येथे भिमजयंती जल्लोषात साजरी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दीक्षाभूमी देसाईगंज येथे भिमजयंती जल्लोषात साजरी.

संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली

वडसा -डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली १४ एप्रिल रोजी सकाळ पासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता अनुयायांचे आगमन सुरू झाले होते. सम्यक जागृत बौद्ध महिला समिती अध्यक्ष ममता जांभूळकर,सचिव श्यामला राऊत,उपाध्यक्ष यशोदा मेश्राम व कोषाध्यक्ष कविता मेश्राम यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व विहारात वंदना घेण्यात आली.

संध्याकाळच्या सत्रात सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रमुख वक्ते निखिल दादा बन्सोड युवा प्रबोधनकार व आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक, गोंदिया यांचे अभ्यास पूर्व मार्गदर्शनात आजच्या सामाजिक व राजकीय घडामोडी मुळे सामाजिक आरोग्य कसे बिघडत चालले आहे व यातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांचे विचारच जगाला तारून नेतील त्यांचे कार्य फक्त एकाच समाजा पुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या दृष्टिकोनातून केले आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम, आरमोरी निर्वाचन क्षेत्र यांच्या हस्ते झाले.अध्यक्षिय भाषणात वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडणे देसाईगंज यांनी राजकीय घडामोडींमुळे शिक्षण, आरोग्य व रोजगार कसे धोक्यात आले आहे असे उदाहरणे देऊन परिस्थिती समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरिता बरसागडे संचलन डॉ. वंदना धोंगडे तर आभार जयश्री लांजेवार यांनी मानले.

कार्यकमास विशेष अतिथी म्हणुन नगराध्यक्षा लता सुंदरकर उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी जेसाभाऊ मोटवानी पोलीस निरिक्षक अजय जगताप इजि. विजय मेश्राम आदिची उपस्थिती होती तर कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते..

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular