ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली:
आजाद समाज पार्टीचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा; गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन.
- गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित MIDC व विमानतळ प्रकल्पांसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आजाद समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला असून, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आज गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी “गडचिरोली हा शेतकऱ्यांचा जिल्हा असून, सुपीक शेती जमीन हिरावून औद्योगिकीकरण करणे मान्य नाही” अशी भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोलीमध्ये औद्योगिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहणाच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना व शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागांमध्ये MIDC आणि इतर औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे.
आझाद समाज पार्टी चे जिलाध्यक्ष राज बन्सोड आणि समस्त आझाद समाज पार्टीचे मुद्दे.
१. गडचिरोली जिल्हा शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांचे जमिनी हिरावून घेऊन औद्योगिकीकरण करणे आम्हाला मान्य नाही.
२.शेजाऱ्याच्या जमिनी वाचवण्यासाठी आमचा संघर्ष.
३.यापूर्वी कोणसरी लढ्यात गुन्हे अंगावर घेतले.यापुढे गुन्हे लागले तरी शेतकऱ्यांचा साथ सोडणार नाही.
४.ही आंदोलन शेतकऱ्यांचे आहे. आम्ही पाठिंबा देत आहोत.





