Homeआरमोरीआरमोरी पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार सचिन झणक रुजू अवैध दारू, वाळू...

आरमोरी पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार सचिन झणक रुजू अवैध दारू, वाळू तस्करी आणि जुगार अड्ड्यांवर अंकुश लावण्याचे आव्हान.

ज्वाला न्यूज 

आरमोरी : आरमोरी पोलीस स्टेशनचे नवीन ठाणेदार सचिन झणक यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर तालुक्यातील अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

आरमोरी तालुक्यातील इंजेवारी, पेट तुकूमसह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा असून, याबाबत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाकडे निवेदनही दिले आहे. तसेच वाळू तस्करी, जुगार अड्डे आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल्समुळे नागरिक त्रस्त असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

 

ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या

 

नवीन ठाणेदार सचिन झणक यांनी अवैध दारू विक्री, वाळू तस्करी, जुगार तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

 

“गुंडागर्दीमुक्त आणि नशामुक्त आरमोरी” हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस प्रशासनाने काम करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

नवीन ठाणेदारांच्या कार्यकाळातील पहिले ३० दिवस महत्त्वाचे ठरणार असून, या काळात अवैध व्यवसायांविरोधात कोणती पावले उचलली जातात, याकडे आरमोरीकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular