Homeदेसाईगंजसावंगी घाटातुन रेती तस्करी सुरूच ! जीपीएस लोकेशनला हरताळ.

सावंगी घाटातुन रेती तस्करी सुरूच ! जीपीएस लोकेशनला हरताळ.

ज्वाला न्यूज

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज

देसाईगंज: देसाईंगंज वरून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांवगी रेती उपसा दि. ९ जुन लाच बंद झाला असला तरी सर्व्हे मधुनअवैध रेती उपसा सुरू असल्याचे धक्कादायक वृत् आहे. उत्खनन केलेल्या रेती वाहतुक वाहनांना जीपीएस सिस्टिम लावले अनिवार्य केले आसनांना सुद्धा सदर बाबीला हरताळ फासून तब्बल ५० हजार ब्रास पेक्षा जास्त रेती वाहतुक केली आहे. शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसुलावर पाणी फेरले गेले असतांना महसुल व खणीकर्म विभाग बघ्याची भुमीका घेत आहेत.

कोंढाळा येथील अवैध रेती वाहतूक प्रकरणात जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कोंढाळ्याचे तलाटी ठाकरे व मंडळ अधिकारी यांचेवर केलेली निलंबनाची कारवाई ताजी असतांना मात्र देसाईगंज महसुल विभागाला धाक राहीला नाही.

सावंगी घाटातुन १६ हजार ब्रास रेती उत्खननाची परवानगी असतांना संबंधित ठेकेदारांनी अवैध उत्खनन करून रातोरात रेतीची विल्हेवाट लावली आहे. फक्त गरजुंना डंपिंग् केलेली रेती वाटप करीत असल्याचे भाषविल्या जात आहे. सदर सर्व्हे मधुन१६ हजार ब्रास रेतीचे उत्खनन असनांना रेतीचा बेकायदेशीर उपसा केल्याचे निदर्शनास येत आहे.

सर्व्हे नंबर २१० ‘ ११८ , २२० ,१९९,२२१ व २२२ मधील तब्बल ४० एकरातुन ५ फुटापेक्षा जास्त उत्खनन करून रेतीची वाहतुक व साठा केल्या जात आहे. महसुल विभाग वडसा याकडे डोळेझाक करीत आहे अशा आरोप गावकर्‍या कडून केला जात आहे. सांवगीअवैध रेती वाहतूक प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घ्यावे अशीही मागणी गावकरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular