चंद्रपूर: – ब्रम्हपुरी शहरातील नामांकित ख्रिस्तानंद हॉस्पिटल मधे मोतीबिंदु शस्त्रकियेनंतर तिन रुग्णाची दृष्टी गेल्याने विशेष चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर हॉस्पिटल सिल करण्यात आले.
मोतिबिंदु शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांना गंभीर जंतुसंसर्ग होऊन तिन रुग्णाची दृष्टी कायमची गेल्यामुळे तक्रारीअंती जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपरेशन थिएटर व काही महत्वाचे विभाग शिल.केले
बॉम्बे नर्सिग होम अँक्ट १९४९ चे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने व स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजुर नसतांनाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते या कारणास्तव जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांनी सदरची कारवाई केली.





