Homeगडचिरोलीशिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे जागतिक वसुंधरा दिन साजरा.

शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे जागतिक वसुंधरा दिन साजरा.

मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली – स्थानिक’ शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे दि. २२ एप्रिल २०२६ ला जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. राकेश करोडकर डॉ. उईके भुगोल विभागाचे प्रा. अनिल सुरणकर प्रा. कु. मुनघाटे मॅडम आदिची उपस्थिती होती.

आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रा. सुरणकर म्हणाले की आज पृथ्वी ची स्थिति दैयनिय झाली आहे सर्व बाजुनी सुरु असलेल्या निसर्गातील -हास मोठ्या प्रमाणात वाढविणारे घटक लोकसंख्या औध्योगिकरण वृक्षतोड यामुळे पृथ्वीवर परिणाम होत आहे हे वेळीच रोखण्याची गरज आहे अशा संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. नंदाजी सातपुते विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , २१ व्या शतकात वाटचाल करणारे स्वतःला प्रगत म्हणणारी माणसेच सृष्टीचे स्वरूपच बदलवुन टाकले आहे हवा पाणी जमीन प्रर्दृसनामुळे मनुष्याचे जिवनच धोक्यात आलेले आहे म्हणून प्रत्येकांनी पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे पावसाचे पाणी जमिनीत जिरविले पाहीजे झाडे लावा झाडे जगवा यामुळे पर्यावरण संतुलित राहील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रा. सुरणकर यांनी केले तर आभार प्रा. मुनघाटे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास महाविघालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular