गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
धानोरा:
गडचिरोली उपविभागातील धानोरा तालुका मधील वाळू गटांची सर्वोच्च बोली रक्कम व इतर देय रकमा शासन जमा केल्यामुळे प्रशांत कंट्रक्शन कंपनी, पत्ता_ टिळक पुतळा गाडखाना महाल _नागपूर यांना गडचिरोली उपविभागातील राजोली येथील सर्वे न 170,171,172,173/1,173/2 व 174 यामधून 18100 एकूण ब्रास रेती घाटातून उत्कलन व वाहतूक करण्याकरिता दिनांक ९ जून 2026 पर्यंत आनी विक्री करण्याकरिता परवानगी दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अटी व शर्तीवर राहून देण्यात आले आहे मात्र सदर कंत्राटदार शासनाचे नियम धाब्यावर ठेवून रेती उपसा राजोली घाटावर नियमबाह्य करीत असल्याचे प्रकार उघडकिस आला आहे,
वृत्त अशे आहे की,
राजोली घाटामधून नियमबाह्य रेती उपसा करीत असल्याचे बाब संबंधित तालुका प्रतिनिधींना मिळाली असता 27 मे ला सकाळी 6,15 ला रेती घाटावर गेले असता जवळ आश्चर्याचा धक्का बसला रेती उत्कलन करण्यापासून साठवणूक करण्यापर्यंत वाहतूक परवानाच अनेक वारका जवळ नव्हता,
*नियम काय म्हणतात*
रेती उत्कलन ही दीड मीटर पर्यंत पाहिजे ती सरासरी दोन मीटर होणे काही भागात अधिक होत आहे त्यातच उत्खलन केलेल्या जागेचा भाग बदलण्यासाठी आधुनिक यंत्रसामोरकीचा वापर करत असल्याचे स्पष्ट प्रीती घाटावर दिसते, उत्कलन जागेपासून ते साठवणूक पर्यंत परवाना आवश्यक आहे त्यात कुठल्याच प्रकारे 2 ट्रॅक्टर सोडून इतर कुणाकडे परवाना दिसलेला नाही, सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उत्कलन केल्या जाते मात्र सहा पूर्वी ट्रॅक्टर उत्करणासाठी लागतात,
*तहसीलदारानी काढले आदेश*
राजुरी घाटावरील रेती उत्कलना बाबत सदर प्रतिनिधींनी तहसीलदार गणेश माळी यांची भेट घेतली असता,
तहसीलदारांनी सदर जागेचे मोजमाप करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख तसेच इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करून मोजमाप करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे,





