ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
कुरखेडा: तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलेश जंगजळकर यांच्यावर शासकीय नोंदी व कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचायत समिती प्रशासनाने कठोर भूमिका घेत, शासकीय रेकॉर्ड जप्त करण्यासाठी कार्यालयाचे कुलूप तोडण्याचा तसेच आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
यापूर्वी अनेकदा नोटीस देऊनही संबंधित ग्रामसेवकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ४ जून २०२६ रोजी पंचनामा करून शासकीय दस्तावेज ताब्यात घेण्याची कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीतील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संबंधित ग्रामसेवकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात
आहे.





