Homeगडचिरोलीपाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन. प्रलंबित मानधान देण्याची मागणी.

पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन. प्रलंबित मानधान देण्याची मागणी.

ज्वाला न्यूज

मुनिश्वर बोरकर गडचिरोली

गडचिरोली – पंचायत समिती स्तरावर गट संसाधन पाणी व स्वच्छता मधे कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे प्रलंबित मानधन त्वरीत अदा करावे या मागणीसाठी कामबंद आंदोलन जिल्हा परिषद गडचिरोली समोर उपोषणाला बसले आहेत.

सर्व तालुका स्तरावर गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कक्ष स्थापण करण्यात आले असुन या विभागात सन २०१२ पासुन कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधानावर प्रामाणीकपणे जादा कामकाज करून सेवा देत आहेत परंतु गेल्या सहा महिण्यापासुन त्यांचे मानधानच मिळाले नसल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची ‘पाळी आलेली आहे तेव्हा शासनाने प्रलंबित मानधान त्वरीत अदा करावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचेकडे केलेली आहे.

उपोषणाला महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी संघटना गडचिरोली जिल्हा चे अध्यक्ष प्रदिप बरई सचिव स्वाती लांजेवार सहीत जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular