ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली: जिल्ह्यातील हजारो हेक्टर सुपीक शेतजमिनी शासनाकडून अधिग्रहित केल्या जात असल्याच्या प्रक्रियेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या अन्यायकारक निर्णयाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आदिवासी समाज सेविका कुसुम आलम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले. सुपीक जमिनींचे होणारे अधिग्रहण तात्काळ थांबवावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली असून, या लढ्याला बळ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





