ज्वाला न्यूज
कुरखेडा:
गावांतील विविध मूलभूत नागरी समस्या, विकासकामे, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवून संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सातही गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडत नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
19 ऑगस्ट रोजी कुरखेडा तालुक्यातील चरविदंड, पालपुंडी, येडासकुही, हुर्यालदंड, कुमुडपार, तुलवीटोला व गंगसायटोला येथील नागरिकांनी आज आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कुरखेडा येथे निवेदन सादर केले.
यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे यांच्यासह संबंधित गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





