चंद्रपूर / सिंदेवाही:
आपल्या धारदार लेखणीने प्रशासनाला घाम फोडणारे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न धडाकेबाज पद्धतीने मांडणारे निर्भीड पत्रकार सुनील विठ्ठल गेडाम यांची ‘न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन’ (NJA) च्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय मान्यताप्राप्त ‘दैनिक वादळ वार्ता’ या वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या सुनील गेडाम यांच्या लेखनात वृत्तपत्राच्या नावाप्रमाणेच प्रशासनात वादळ निर्माण करण्याची धमक आहे. त्यांच्या या बिनधास्त आणि रोखठोक पत्रकारितेची दखल घेत संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी कडून त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रशासनाला हादरवणारी वादळी पत्रकारिता
सुनील गेडाम यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि सिंदेवाही तालुक्यात प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे:शासकीय रुग्णालयातील अत्यंत संवेदनशील अशा शवविच्छेदन (Postmortem) प्रकरणातील गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदी आपल्या वृत्तमालिकेतून उघडकीस आणली.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी ग्रामसेवकांनी पुकारलेल्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आंदोलनाची पोलखोल केली. या बातमीची दखल घेत प्रशासनाने आंदोलनात सहभागी सर्व ग्रामसेवकांचे आंदोलन काळामधील
वेतन रोखण्याचे ऐतिहासिक आदेश जारी केले.
कुठल्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला न जुमानता नेहमी जनहिताचे आणि सत्याचे मुद्दे मांडणारे पत्रकार म्हणून सुनील गेडाम यांची ओळख आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पत्रकारितेतील लढवय्या नेतृत्वाला मोठे बळ मिळाले असून, त्यांना नियुक्ती बाबत मित्र परिवार कडून अभिनंदन करण्यात येत आहे.





