ज्वाला न्यूज
सिंदेवाही :
पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत ‘रिलीज ऑर्डर’ देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिंदेवाही महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदये (वय ३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने दोन ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टीम बसवून दिली होती. या सिस्टीमचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या रिलीज ऑर्डरसाठी आरोपीने सुरुवातीला ४ हजार रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. १ जुलै २०२६ रोजी सापळा रचून ३ हजार रुपये लाच स्वीकारताना रंदयेला पकडण्यात आले. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर एसीबीच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू
आहे.





