Homeगडचिरोलीगडचिरोली नगरपरिषदेत खळबळ! नगरसेविका शिल्पा हेमके यांच्या कथित अनधिकृत बांधकामावरून...

गडचिरोली नगरपरिषदेत खळबळ! नगरसेविका शिल्पा हेमके यांच्या कथित अनधिकृत बांधकामावरून कारवाईची मागणी.

ज्वाला न्यूज 

गडचिरोली | ज्वाला न्यूज

गडचिरोली नगरपरिषदेच्या हद्दीतील मौजा गडचिरोली येथील सर्वे क्रमांक ११/१/क मधील भूखंड क्रमांक ६६ संदर्भात अनधिकृत बांधकामाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरसेविका शिल्पा अंकित हेमके (गव्हारे) यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे नगरसेविका पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

जिल्हा सहआयुक्त (न.प. प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्याकडे २४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या पत्रातून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

निवेदनातील आरोपानुसार, संबंधित भूखंडावर पूर्वी खुल्या जागेतील निवासी वापरासाठी अनधिकृत प्लॉट तयार करून प्लॉटची विक्री करण्यात आली. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक टाउनशिप अधिनियम, १९६५ मधील तरतुदींचा संदर्भ देत या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

 

तसेच, विकास झाल्यानंतर प्लॉटचे गहाणखत सोडविण्यात आले असले तरी भूखंड क्रमांक ६६ वर पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बांधकामासाठी नगरपरिषदेची परवानगी किंवा मंजूर नकाशा उपलब्ध नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, तसेच नगरसेविका पदाबाबतही नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे, निवेदनात आठ दिवसांची मुदत उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आझाद समाज पार्टी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular