गडचिरोली – मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली – शोभाताई सेनापती गेडाम किटाळी जिल्हा चंद्रपूर हिने १४ आर जमीन भिक्खु धम्म सेनापती यांना धम्म कार्यासाठी जमीन दान केली सदर जागेवर धम्मकुटी बांधुन त्या धम्मकुटी चे उदघाटन भन्ते ज्ञानज्योती महाथेरो संद्यारामगिरी यांच्या उपस्थितीत विधिवत उदघाटन करण्यात आले. भन्ते ज्ञानज्योती यांची धम्मदेशना झाली. सामजिक कार्यकर्ता शुशीला भगत आलापल्ली हिने किटाळी धम्मकुटी साठी मुर्तीदान केली. जमीन दान करणाऱ्या शोभाताई सेनापती गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास भन्ते ज्ञानज्योती भिक्खु महानाम मुंबई भन्ते सेनापती महायान , शुशीला भगत धम्मबंधु गुणवंत डोर्लीकर सहीत भिक्खुसंघ व किटाळी परिसरातील बहुसंख्य धम्मबांधव प्रामुख्याने उपस्थित होते





