गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर संपादक ज्वाला न्युज.
देसाईगंज – कोंढाळा गावा जवळील वैनगंगा नंदिपात्रातुन शासनाने ठरवुन दिलेल्या जागेतुन दि . ९ जुन २०२६ पर्यत उपसा करून एका ठिकाणी डंम्पिग करण्याचे काम एका ठेकेदारांनी केले परंतु सदर रेती विक्री करतांना व उचल करतांना मांत्र दिवशा ढवळ्या बिनानंबर प्लेटच्या ट्रालीने वाहतुक केल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन शासनाने ठरवुन दिलेल्या 2250 रेती ब्रास पेक्षा कितीतरी पटीने उपसा करून डंम्पिग मधुन अवैध रेती राजरोसपणे वाहतूक करीत असुन सुद्धा कोंढाळाचे तलाटी ठाकरे आपल्या कार्यालयात असतांना विचारले असता अशा प्रकार घडूच शकत नाही असे उत्तर दिले.
दि. १८ जुन ला कोंढाळा येथे टम्पिंग केलेली रेती ची वाहतुक बिना नंबर प्लेटच्या अनेक ट्राक्टर ट्रालीने कोंढाळा ते वडसा उसेगाव येथे दिवसा ढवळ्या राजरोसपणे वाहतूक केल्या जात होती. याबाबत कोंढाळ्याचे पटवारी ठाकरे यांना विचारणा केली असता सदर ठेकेदारांच्या रेती कारवाई चौकशी व मोजमाप भुमी अभिलेख विभाग वडसा यांनी केली असुन तशा अहवाल sDo वडसा कार्यालय पाठविले आहे परंतु अजुनही अहवाल प्राप्त झाला नाही.
शासनाने ठरवुन दिलेल्याच जागेतुन रेतीचा उपसा करणे दिड मिटर खोली करणे नदि दिपात्रातुन रेती चा उपसा दि. ९ जुन पर्यतच करणे वाहतुक करतांना ट्राक्टरवर ताडपत्री झाकून वाहतुक करणे यापैकी एकाही नियमांचे पालन सदर ठेकेदारांनी केलेले नाही त्यापेक्षाही बिना नंबर प्लेटचा ट्राक्टर ट्रालीने वाहतूक करणे हे सर्व अवैध धंदे रेती ठेकेदार करीत असुन या संपूर्ण कामात व तपासणी अहवालाच्या कामात तलाटी तहसिलदार व भूमी अभिलेख कार्यालय सर्व वडसा यांचा आर्शिवाद तर नाही ना असे बोलल्या जात आहे. तरी संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेली आहे.





