गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारताच राज्यभरातील भेसळखोर आणि गुटखा विक्रेत्याविरोधात धडक कारवाई सुरु करून दि. २५ मे ला ५३ आस्थापनाची चौकशी करून कारवाई केली.
राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यानी प्रशासनाच्या मुंबई कोकण पुणे नाशिक अमरावती व छत्रपती संभाजीनगर व नागपूर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर व गुटखा विक्रेते यांच्यावर छापे टाकून धडक कारवाई केली. राज्यातील विविध भागातील प्रतिबंधक गुटखा सुंगधित तंबाखु भेसळयुक्त दुध नियमबाह्य खाद्यपदार्थ दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई केली यात ५३ आस्थापनाची चौकशी करुन यात ३४ ठिकाणी गुटखा पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले यात २५ व्यवसाईकावर FRI दाखल करून 33 व्यक्तींना अटक केली तर ५ वाहने जप्त केली तसेच २७ आस्थापना सिल केलेल्या आहेत.





