ज्वाला न्यूज
गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
चंद्रपूर -रिपब्लिकन चळवळीत *नेताजी* म्हणून ओळख असलेले आदरणीय नेताजी उर्फ विठ्ठल तु. बुरचुंडे यांचे तारीख ४ जून २०२६ मौजा बोर्डा वरोरा येथे निर्वाण झाले. ते ८४ वर्षांचे होते.*
*नेताजी हे अगदी सुरुवातीपासून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात कार्यरत होते.*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक भूमिहीन सत्याग्रह पुकारण्यात आला त्याचे नेताजी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सत्याग्रही होते.*
*नेताजी हे जेष्ठ आणि वरिष्ठ रिपब्लिकन नेते होते. हे पक्षाचे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष होते.*
*वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चळवळीसाठी रिपब्लिकन जवान योद्धा म्हणून सतत धावपळ आणि मार्गदर्शन करत होते.*
*नेताजीना एक मुलगा आणि दोन मुली तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे.*
*नेताजी यांचा अंतिमसंस्कार तारीख ५ जून २०२६ ला त्यांच्या मूळ गावी मौजा माजरी ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे दुपारी ०२:०० वाजता पार पडला.*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष बाजीरावजी उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेऊन कार्यकर्त्यांनी नेताजींना विनम्र जयभीम करून आदरांजली वाहिली.*
*माजरी येथील मुक्तीधाम येथे नेताजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ आप्तपरिवार आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. नेताजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले तो दिवस म्हणजे ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस होता.*





