ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गडचिरोली शहर यांच्या वतीने NEET परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरप्रकार, विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींच्या निषेधार्थ आज दि. ५ जुनला गडचिरोली जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले
या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच NEET परीक्षेतील गैरप्रकारांची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली
निवेदन देतांना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर उपाध्यक्ष दशरथ साखरे उपाध्यक्ष मारोती भैसारे लवकुश भैसारे धनराज पाझारे जैराम उंदिरवाडे मोरेश्वर निमगडे नेताजी मेश्राम राहुल घोनमोडे सुरेश मेश्राम राजु वनकर नाजुक भैसारे महिला अध्यक्षा संघमित्रा राजवाडे विशाखा देवतळे लता भैसारे वासुदा शेख मंगला बावणवाडे देवालाबाई शेन्डे प्रेमिला नान्होरीकर सुमन उंदिरवाडे ज्योती मेश्राम कल्याणी गोंडाणे वृषाली उंदिरवाडे आदि साहित
रिपब्लिकन पार्टीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .






