संपादक मंगेश बन्सोड
आरमोरी:
आरमोरी वरून वडसा येथे कामानिमित्त जात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना आरमोरी-वडसा मार्गावर घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत व्यक्तीचे नाव शिवाजी ढिवरे (रा. ब्रम्हपुरी) असे तात्पुरते समोर आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, आरमोरी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संबंधित ट्रक ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकचा क्रमांक — MH 40 BG 7497 असा आहे.
घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.





