गडचिरोली – मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक ज्वाला न्युज
गडचिरोली – गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब परिसरात गेल्या आठ दिवसात वाघाचा घुमाकुळ सुरु असुन आठ दिवसात दोन बैल ठार केले तर दोन बैलांना वाघाच्या पंजा चे घाव असुन मौशीखांब ते डोंगर परिसरात झुडपी जंगलात वाघाने बस्तान मांडले असुन शेतकऱ्यांना सदर परिसरात शेती करण्याकरीता जाणे मुस्कील केले आहे. वनविभाग कार्यालय मरेगांव च्या वनकर्मचार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
दि. ७ जुनच्या रात्रौ ९ वाजता धर्माजी कोरपे मौशीखांब यांचा बैल घरी परतला बघतात तर त्यांच्या पाठीवर वाघाचे पंजे धिप्पाड बैल सुदैवाने बचावला यापूर्वी मौशीखांब येथील प्रकाश मडावी व वसंत भुरसे यांच्या बैलाला ठार केले आहे. वनपाल समर्थ व साहरे गार्ड मॅडम यांनी मृत्यु बैलाचा पंचनामा केलेला आहे. तरीही वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी मौशीखांब वासीयांनी केलेली आहे.





