Homeगडचिरोलीवडसादेसाईगंज येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न.

देसाईगंज येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न.

संपादक मंगेश बन्सोड

दिनांक ०८ एप्रिल २०२६

 

देसाईगंज : नगर परिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा-१ कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री रामदासजी मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले.

 

मार्गदर्शन करताना आमदार रामदास मसराम यांनी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे सांगितले. तसेच महसूल विषयक अडचणी तत्काळ मार्गी लावण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान दिव्यांग नागरिक व लहान मुलांना विविध आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

 

शिबिरामध्ये महसूल विषयक विविध प्रकरणांचे निराकरण, अर्ज स्वीकृती तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

 

कार्यक्रमाला उपस्थित, तहसीलदार देसाईगंज प्रीती डुडूलकर मॅडम, नायब तहसीलदार कुंभरे, नायब तहसीलदार भोके मॅडम, नायब तहसीलदार धात्रक, नगर परिषद मुख्याधिकारी सतीश चौधरी, डॉ गहाणे, पुरवठा निरीक्षक अधिकारी कृषी पर्यवेक्षक शीतल खोब्रागडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार सर, माजी उपसभापती नितीन राऊत,अपर्णा राऊत, कमलेश बारस्कर, संतोष मसराम, लिलाधर भर्रे, मामीडीवार, पत्रकार किशोर मेश्राम तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular