गडचिरोली मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज.
गडचिरोली – गडचिरोली नगर परिषद प्रभाग ९ अ च्या पोट निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात भारतिय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अंकुश नैताम यांनी बाजी मारुन १3७१ मते मिळवून कांग्रेसचे विनोद भांडेकर यांचा दणदणीत पराभव केला.
सदर निवडणुकीत भाजपाचे अंकुश दिलीप नैताम यांना 137l कांग्रेसचे विनोद रामकृष्ण भांडेकर यांना ११०७ मते मिळाली तर अपक्ष सुनिल भाष्कर बावने यांन ९८ मते मिळाली.
भाजपाचे विजयी उमेदवार अंकुश नैताम यांचा निवडणुक प्रचारात आमदार डॉ. मिलिंद नरोटे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे भाजपाचे जेष्ठ नेत बाबुराव कोहळे आदिनी अथक परिश्रम घेतले. अंकुश नैताम यांनी आपल्या विजयाची मिरवणुक काढून आनंद व्यक्त केला.





