ज्वाला न्यूज
कुरखेडा | प्रतिनिधी
कुरखेडा:
नगर पंचायत कुरखेडा पोटनिवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्र. 16 मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रतिभा रवि उईके यांनी विजय संपादन केला. त्यांच्या विजयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीत आमदार श्री रामदासजी मसराम यांनी सहभागी होत त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार रामदासजी मसराम यांनी जनतेने काँग्रेस पक्षावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
विजय रॅलीत कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
मुख्य मुद्दे :
🔹 प्रभाग क्र. 16 मध्ये काँग्रेसच्या सौ. प्रतिभा उईके यांचा विजय
🔹 विजय रॅलीत आमदार रामदासजी मसराम यांची उपस्थिती
🔹 विजयी उमेदवारांचा सत्कार व शुभेच्छा
🔹 मतदारांचे आभार व्यक्त
🔹 विकासकामांना गती देण्याचा निर्धार





