Homeकुरखेडाअवैध दारू तस्करीवर कुरखेडा पोलिसांची मोठी कारवाई; ४ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल...

अवैध दारू तस्करीवर कुरखेडा पोलिसांची मोठी कारवाई; ४ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

कुरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत एक आरोपीला अटक केली. या कारवाईत सुमारे ४ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

आज शनिवार सकाळच्या पहाटे कुरखेडा पोलीस स्टेशनचे पथक खैरी–आंधळी मार्गावर गस्त घालत असताना खैरी पांदण रस्त्याजवळ संशयास्पद चारचाकी वाहन आढळले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन अडवून झडती घेतली असता वाहनात देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. यावेळी वाहन चालक आरोपी अकालीसिंग संगतसिंग पटवा (वय २७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड, देसाईगंज) याला ताब्यात घेण्यात आले.

 

पोलिसांनी वाहनातून १ लाख ५२ हजार ८८० रुपयांची २६ पेटी देशी दारू तसेच अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. अशा प्रकारे एकूण ४ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

 

ही कारवाई ठाणेदार महेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोये, पोलीस हवालदार शेखलाल मडावी, महिला पोलीस शिपाई अरुणा लोखंडे व त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular