गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड
आरमोरी : जोगीसाखरा-आरमोरी मार्गावर आज सकाळच्या सुमारास मोटरसायकल अपघाताची घटना घडली. या अपघातात आष्टा येथील सरपंच पदी असलेले गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींपैकी एक जण हनुमान वॉर्ड, आरमोरी येथील रहिवासी असून दुसरे आष्टा येथील सरपंच पदावर नियुक्त रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका गंभीर होता की, आष्टा येथील अपघातग्रस्ताच्या नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.





