गडचिरोली मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली – धानोरा तालुक्यातील रांगी वनविभागातील कार्यरत क्षेत्र सहाय्यक वनपाल करमचंद व्ही ढवळे यांना पदोन्नती मिळाली असुन ते परभणीचे वनपरिक्षेत्रधिकारी RFO झाले.
क्षेत्र सहाय्यक ढवळे यांचा मिळालेल्या पदोन्नती बाबत त्यांचा निरोप समारंभ व सत्कार वनविभाग रांगी येथे दक्षिण धानोर्याचे वनपरिक्षेत्रअधिकारी सुमित पुरमसेट्टीवार यांचा अध्यक्षते खाली पार पडला.
वनपाल RFO ढवळे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना Rfo म्हणुन पदोन्नती मिळाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन धानोरा Rfo शिवशंकर कापते वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित पाटिल वनपरिक्षेत्र अधिकारी रोकडे वनपरिक्षेत्र अधिकारी पवळ वनपरिक्षेत्र अधिकारी लाळे क्षेत्र सहाय्यक दहिकर श्वेता कापकर शिक्षक दिवाकर भोयर वनसमिती अध्यक्ष देवराव कुनघाडकर आदिची उपस्थिती होती. यावेळी Rfo ढवळे यांना भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक कोहळे तर आभार वनरक्षक राऊत यांनी केले.





