Homeगडचिरोली*गडचिरोली - उमरखेड बस मुरखळा (नवेगाव) जवळ पलटून ४५ प्रवासी जखमी*

*गडचिरोली – उमरखेड बस मुरखळा (नवेगाव) जवळ पलटून ४५ प्रवासी जखमी*

गडचिरोली मुख्य संपादक मुनिश्नर बोरकर

संपादक मंगेश बन्सोड

गडचिरोली:

गडचिरोली शहराजवळील मुरखेडा (नवेगाव) परिसरात आज सकाळी एक भीषण बस अपघात घडला. गडचिरोली आगारातून उमरखेडकडे निघालेली प्रवासी बस अचानक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटली. या अपघातात तब्बल ४५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत पोलिसांच्या सहाय्याने जखमी प्रवाशांना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी परिवहन विभाग व पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील धोकादायक वळणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular