Homeभद्रावतीपत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल : मनोज मोडक यांना “मूकनायक नॅशनल अवॉर्ड...

पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल : मनोज मोडक यांना “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६”*

टं

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर संपादक

 भद्रावती : (प्रतिनिधी)

भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मा. मनोज मोडक यांना “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” ने सन्मानित करण्यात आले आहे. नांदेड येथून प्रकाशित होणारे दैनिक वीर शिरोमणी तसेच दैनिक व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्यातील अनेक राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पत्रकार, कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजात न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तसेच पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या प्रेरणादायी व समाजहितकारी उल्लेखनीय कार्याची दखल घेत मा. मनोज मोडक यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते लॉर्ड बुद्धा टीव्हीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी असून पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत जनसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान समाजातील वंचित, शोषित आणि सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.

मा. मनोज मोडक यांना प्राप्त झालेल्या “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” मुळे भद्रावती तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular