कोंडेखल येथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
संपादक मंगेश बन्सोड
सावली : सावली तालुक्यातील कोंडेखल येथे बौद्ध समाजातील समाज बांधव एकनिष्ठ राहुन प्रत्येक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहून उत्साहाने साजरी करतात. तसेच दर दिवशी सायंकाळी सर्व समाज बांधव राजगिरी बौद्ध विहार कोंडेखल येथे उपस्थित होऊन बौद्ध वंदना घेतात. 
त्या प्रमाणे आज दिनांक 0१ मे बौध्द पौर्णिमा निमित्त सर्व बौद्ध समाज बांधव, भगिनी एकजूट होऊन मोठ्या उत्साहाने बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम पार पाडले.
कार्यक्रमांचे ध्वजारोहण राजगिरी बौध्द विहार अध्यक्ष सूर्यभान उंदिरवाडे यांच्या हस्ते झाला. आणि गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित आणि हार अर्पण किशोरजी उंदिरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित असलेले मान्यवर
राजगिरी बौध्द विहार अध्यक्ष सूर्यभान उंदिरवाडे , सचिव पुनाजी साखरे, सभासद नारायण कोटंगले, किशोरजी उंदिरवाडे, सुनील भैसारे, संतोष उंदिरवाडे, आणि समस्त बौद्ध समाज कोंडेखल.





