ज्वाला न्यूज
पुणे:
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक चेताली बाळासाहेब गपाट (वय ३५) यांना ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यात ‘बी’ फायनल अहवाल सादर करण्यासाठी तसेच भविष्यात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला ८ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाख रुपये निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत १४ जुलै २०२६ रोजी एसीबी, पुणे येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी करून १५ जुलै २०२६ रोजी सापळा रचला. या कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक चेताली गपाट यांनी दिघी पोलीस ठाण्यात ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), पुणे करत आहे.
टीप: वरील फोटो मध्ये फोटो ही फाइल फोटो आहे.





